rahul gandhi and narendra modi. 
देश

सूटा-बूटाच्या मित्रांसाठी मोदींनी...राहुल गांधींचा धक्कादायक आरोप

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात (Farm Laws) शेतकरी आंदोलन (Farmers Protest) करत आहेत. दुसरीकडे विरोधी पक्ष विशेष करुन काँग्रेस या मुद्द्यावरुन सरकारवर हल्लाबोल करत आहे. कृषी कायदे परत घेण्याच्या मागणीवर ठाम असलेल्या काँग्रेसने मोदी सरकावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सरकारवर भांडवलदारांचे कर्ज माफ केल्याचा आरोप केला आहे, तसेच केंद्र सरकार अन्नदात्यांचे उत्पन्न साफ करत असल्याचं म्हटलं आहे. 

VIDEO : पाकिस्तानात होतेय स्वतंत्र 'सिंधूदेशा'ची मागणी; मोर्चात लावले...

राहुल गांधी यांनी सोमवारी एक ग्राफिक्स शेअर करत ट्विट केलं आहे. आपल्या सूट-बूटच्या मित्रांचे 875000 कोटींचे कर्ज माफ करणारे मोदी सरकार अन्नदात्यांचे उत्पन्न नष्ट करण्याच्या तयारीत आहे, असं म्हणत त्यांनी टीका केली आहे. कृषी कायद्यावरुन राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर वारंवार टीकास्त्र सोडले आहे. 

केंद्र सरकारने चर्चेच्या 10 व्या फेरीच्या आधी आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांना तीन कृषी कायद्यांच्या बाबतीत असणाऱ्या शंका दूर करण्यासाठी म्हणून एक प्रस्ताव पाठवला आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी रविवारी म्हटलंय की सरकारने मंडई आणि व्यापाऱ्यांच्या नोंदणीशी संबंधित शंकांना दूर करण्यासाठी म्हणून प्रस्ताव पाठवला आहे. जेणेकरुन त्यावर चर्चेच्या 10 व्या फेरीत विचार-विमर्श होऊ शकेल.

शताब्दी रॉय यांना मिळाली 'ममता'; पक्ष सोडण्याच्या धमकीनंतर झालं...

ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना कृषी मंत्री म्हणाले की, आम्ही कृषी मंत्र्यांना एक प्रस्ताव पाठवला आहे. ज्याद्वारे आम्ही इतर गोष्टींशिवाय मंडई आणि व्यापाऱ्यांच्या संदर्भातील शंका दूर करण्यासाठी सहमत आहोत. सरकारने पराली जाळण्यासंदर्भातील आणि वीज कायद्यांबाबत चर्चा करण्यासाठी देखील सहमती दिली आहे. मात्र शेतकरी संघटना फक्त कायद्यांना रद्दबातल करु इच्छित आहेत.

दरम्यान, शेतकरी गेल्या 50 पेक्षा अधिक दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांनी कृषी कायदे रद्द करण्याची मागणी कायम ठेवली आहे. दुसरीकडे सरकारने कायद्यात सुधारणा करण्याची तयारी दाखवली आहे, पण कायदे रद्द करणार नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये तिढा कायम आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Auto Taxi Permit: फेक परमिट रिन्यूअलला लगाम लागणार! ऑटो-टॅक्सी चालकांची आता बायोमेट्रिक ओळख होणार, RTOचा कडक निर्णय

Education Recruitment Update: अशासकीय अनुदानित महाविद्यालयांत ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक भरतीला मंजुरी; आरक्षण अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण

Latest Marathi News Live Update : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार नाही, जय पवार यांची माहिती

पालघरमध्ये मोठा राजकीय भूकंप! शिवसेना-भाजपला खिंडार; बड्या नेत्यांचा बविआमध्ये प्रवेश

11th Admission : अकरावी प्रवेशासाठी १२.४९ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; पहिल्या फेरीची निवड यादी शुक्रवारी जाहीर

SCROLL FOR NEXT